नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर सौ अश्विनी कमलेश निकम यांचा शहरात पाहणी दौरा

 नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर सौ अश्विनी कमलेश निकम यांचा शहरात पाहणी दौरा

उल्हासनगर, दि २६: जनतेने मला निवडून दिले आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असेल असा शब्द उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर सो अश्विनी कमलेश निकम यांनी दिला होता. आणि तो शब्द त्यांनी पूर्ण करण्याकरिता महापौर पद हाती घेतल्यापासून उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. व त्या समस्याचे निवारण करण्यासाठी पाहणी दौरा सुरू केला आहे. चक्क महापौर आपल्या दारी येऊन आपल्या समस्या जाणून घेत असल्याने व त्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित आदेशही देत असल्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महापौर अश्विनी निकम यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर शहराला पहिल्यांदाच असा महापौर मिळाला आहे. जो पालिकेतील महापौर खुर्चीत कमी दिसतो पण शहरातील समस्या सोडवण्यासाठी दिवसभर शहरात फिरतो असा महापौर शहराला लाभला आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे,
उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्याकडे उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटल बाबत काही तक्रारी आल्या होत्या. बुधवारी त्यांनी सेंट्रल हॉस्पिटलचा दौरा करून त्या रुग्णालयातील रुग्णांची संवाद साधून त्यांची विचारपूस केली. याशिवाय रुग्णालयातील काही समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांना त्या समस्या तातडीने सोडवण्याची आदेश दिले. याशिवाय उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ५ परिसरातील प्रेम नगर टेकडी या परिसरात देखील पाहणी दौरा करून त्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना महापौर यांनी नागरिकांच्या विविध समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. याशिवाय उल्हासनगरतील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथील अशोक वन कॉलनी परिसरात देखील महापौर अश्विनी निकम यांनी दौरा करून त्या परिसरातील काही महिलांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या. काही समस्या पाण्यासंदर्भात होत्या तर काही समस्या रस्त्या संदर्भात होत्या. नागरिकांच्या समस्या महापौर यांनी समजून घेतल्या तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या समस्या त्वरित सोडवण्याचे आदेश दिले. त्यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक व भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, नगरसेविका अंजली साळवे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी महापौर यांनी टोल फ्री मोबाईल नंबर देखील नागरिकांच्या सेवेसाठी जाहीर केला होता. यावर शहरातील नागरिकांच्या समस्याच्या तक्रारी मिळताच त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी सुरू केला आहे. आता चक्क शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापौर आपल्या दारी येत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उल्हासनगर शहर स्वच्छ सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी जनतेने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे असे मत महापौर यांनी व्यक्त केले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *