निफ्टीचे 20000 ची पातळी गाठण्याचे स्वप्न भंगले

 निफ्टीचे 20000 ची पातळी गाठण्याचे स्वप्न भंगले

मुंबई, दि. 22 (जितेश सावंत): गेल्या काही सत्रांपासून शेअर बाजार सातत्याने नवनवीन विक्रम करत होता.गेल्या आठवड्यात सुद्धा बाजाराने नवीन विक्रम केले, गुरुवारी निफ्टीने 20 हजाराच्या पातळी जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी निफ्टी 20 हजाराची पातळी गाठेल अशी अपेक्षा होती.परंतु इन्फोसिस आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या जून तिमाहीच्या निराशाजनक निकालांमुळे बेअर्सनी शुक्रवारी दलाल स्ट्रीटवर हल्ला केला तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS) या ब्लूचिप कंपन्यांच्या समभागातील विक्रीमुळे देखील गुतवणूकदारांचे मनोधैर्य खचले परिणामी बाजारातील घसरण वाढली व निफ्टीचे 20000 ची पातळी गाठण्याचे स्वप्न भंगले.

आठवड्याचे पहिले चार दिवस FII /परकीय भांडवलाचा सतत येणारा ओघ, जास्त प्रमाणातील मान्सून आणि चांगले तिमाही निकाल यामुळे नवीन विक्रम रचण्यात गेले.
गेले दोन ते तीन आठवडे नमूद केल्याप्रमाणे बाजाराचे वाढलेले मूल्यांकन(valuation) हा देखील घसरणीचा प्रमुख मुद्दा ठरला. अमेरिका वगळता भारत ही सध्या जगातील सर्वात महागडी बाजारपेठ आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मार्केटमध्ये कोणत्याही नकारात्मक बातम्यांमुळे जोरदार घसरण होऊ शकते.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने 26 जुलै रोजी अमेरिकेतील FOMC rate decision कडे असेल.
Technical view on nifty-. बाजाराने गेल्या आठवड्यात नवीन विक्रमी पातळी गाठली.

मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजार तांत्रिक दृष्ट्या ओव्हर बॉट झोन मध्ये असल्याने शेवटच्या दिवशी बाजारात जोरदार घसरण झाली. शुक्रवारी निफ्टीने 19745 चा बंद भाव दिला.

निफ्टीसाठी 19,595-19563 हे महत्वपूर्ण सपोर्ट स्तर राहतील हे तोडल्यास निफ्टीतील घसरण वाढेल व निफ्टी 19433-19385-19361-19327-19300-19246 हे स्तर गाठेल.

बाजाराची विक्रमी रॅली सुरूच

सलग तिसऱ्या दिवशी व आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने आपली विक्रमी घोडदौड सुरूच ठेवली.निफ्टीने प्रथमच 19700 व सेन्सेक्सने 66650 चा टप्पा पार केला. जागतिक बाजारात संमिश्र वातावरण असून देखील बँकिंग व आयटी समभागांमधील जोरदार खरेदीआणि परदेशी गुंतवणूकदारांकडून वाढलेला ओघ यामुळे निर्देशांकांनी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला.दिवसभराच्याअखेरीससेन्सेक्स 529.03 अंकांनी वधारून 66,589.93 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 147 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,711.50 चा बंद दिला. Record rally continues Nifty’s dream of reaching 20000 level shattered

बाजार विक्रमी उच्चांक राखण्यात अपयशी

मंगळवारी संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर व सुरुवातीच्या व्यापारात प्रामुख्याने बँकिंग समभागांमध्ये झालेली खरेदी यामुळे बाजाराने दिवसाची सुरुवात ताज्या विक्रमी उच्चांकासह मजबूत नोटवर केली.सेन्सेक्स आणि निफ्टी 50 यांनी अनुक्रमे 67,007.02 आणि 19,819.45 ह्या त्यांच्या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला.परंतु दुपारनंतर नफावसुलीमुळे सुरुवातीचा नफा नष्ट झाला.पण सलग चौथ्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाले.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 205.21अंकांनी वधारून 66,795.14 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 37.80 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,749.30 चा बंद दिला. Market fails to hold to record high
सेन्सेक्सने 67 हजाराची पातळी केली पार
बुधवारी भारतीय निर्देशांकांनी सलग पाचव्या सत्रात विजयी घोडदौड सुरू ठेवली,सर्व क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराची सुरुवात नव्या विक्रमासहित झाली पण नफावसुलीमुळे बाजार तेजी टिकवण्यात अयशस्वी ठरला. मात्र शेवटच्या तासातील खरेदीमुळे बाजाराला दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बंद होण्यास मदत झाली.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 302.30 अंकांनी वधारून 67,097.44 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 83.90 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,833.20 चा बंद दिला.Sensex jumps 302 pts, ends atop 67,000

निफ्टी 20,000 च्या जवळ
गुरुवारी सलग सहाव्या दिवशी बाजाराने आपली विक्रमांची मालिका सुरूच ठेवली. संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली व सुरुवातीच्या तासात तोटा वाढत गेला तथापी, दुपारनंतरच्या सत्रात रिकव्हरीमुळे निफ्टीने 20,000 च्या जवळ जाण्यात यश मिळवले.FMCG, बँकिंग, तेल आणि वायू समभागात खरेदीमुळे बाजार वाढण्यास मदत झाली.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 474.46 अंकांनी वधारून 67,571.90 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 146 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 19,979.20 चा बंद दिला. Nifty inches closer to 20,000

सेन्सेक्स 888 अंकांनी गडगडला

गेल्या काही सत्रांपासून शेअर बाजार सातत्याने नवनवीन विक्रम करत होता.आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी निफ्टी 20 हजाराची पातळी गाठेल अशी अपेक्षा होती परंतु बाजाराने सलग सहा दिवसांच्या तेजीला ब्रेक लावला.IT क्षेत्रातील प्रमुख Infosys चे कमकुवत Q1FY24 परिणाम आणि वाढीचा अंदाज कमी केल्याने (Weak guidance) सेन्सेक्स आणि निफ्टीला ब्रेक लागला.तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(TCS) ,हिंदुस्थान युनिलिव्हर(HUL) या ब्लूचिप कंपन्यांच्या समभागातील विक्रीमुळे बाजारातील घसरण वाढली दिवसभरात सेन्सेक्स दिवसभरात सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 887.64 अंकांनी घसरून 66,684.26 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 234.20 अंकांची घट होऊन निफ्टीने 19,745 चा बंद दिला.
Sensex drops 888 pts .

( लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत )

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *