निफ्टीचा नवीन विक्रमी उच्चांक, पुढील आठवड्यात जाहीर होणारे GDP आकडे ठरवतील बाजाराची दिशा.

 निफ्टीचा नवीन विक्रमी उच्चांक, पुढील आठवड्यात जाहीर होणारे GDP आकडे ठरवतील बाजाराची दिशा.

सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधार

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत) : 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तेजीला पुढे नेले. उत्तम मॅक्रो डेटा, जागतिक बाजारातून मिळालेला पाठिंबा या जोरावर निफ्टी 50 निर्देशांकाने 22,297.50 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, विदेशी गुंतवणूकदारांची (FII) नसलेली साथ आणि यूएस बाँड यील्ड मधील वाढ याकडे बाजार दुर्लक्ष करताना दिसला.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने भारत आणि यूएसचे तिमाही GDP आकडे (quarterly GDP numbers by India & US),मंथली फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी (monthly expiry of February futures & options contracts),
मासिक जागतिक उत्पादन PMI डेटा(monthly global manufacturing PMI data),आणि वाहन विक्रीचे आकडे (auto sales), विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका (FII Flow) आणि तेलाच्या किमती (Oil Prices) याकडे राहील.

Technical view on nifty-

शुक्रवारी निफ्टीने 22,297 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला निफ्टीने 22212.7 चा बंद भाव दिला. निफ्टी साठी 22183.30-22126-22040.7-22018-21962-21812-21797-21740.80-21697 हे महत्वाचे सपोर्ट(Support) आहेत हे तोडल्यास निफ्टी 21640-21598-21576.05-21547-21517-21500-21477-21448-21434-21365-21329-21285,हे स्तर गाठेल.तर वरच्या स्तरावर निफ्टी साठी 22239.80-22278-22290-22297-22343-22389 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

निफ्टीचा नवीन विक्रमी उच्चांक

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात तेजी पहावयास मिळाली. बाजार सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले. निफ्टीने 22,186.65 चा नवीन ऑल टाईम हाय गाठला. संमिश्र जागतिक संकेतांमुळे,बाजाराने सकारात्मक सुरुवात केली परंतु सुरुवातीच्या तासांत बाजार नफा आणि तोटा यांच्यात झुलत राहिला.परंतु बहुतेक क्षेत्रातील आणि हेवीवेट्समधील खरेदीमुळे बाजाराला दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बंद होण्यास मदत झाली. Nifty hits fresh all-time high
निफ्टीचा 22,197 चा विक्रमी बंद.

मंगळवारी सलग सहाव्या दिवशी भारतीय बाजारात वाढ झाली. निफ्टीने 22215.60 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला.बँका आणि वित्तीय सेवांमधील समभागातील जोरदार खरेदी मुळे बाजार चांगलाच वधारला.तथापि, मिड आणि स्मॉल कॅपमधील शेअर्स मध्ये नफावसुलीमुळे घसरण पाहावयास मिळाली.मिड आणि स्मॉल कॅपमधील समभागांचे उच्च मूल्यांकन (high valuation) असल्याने गुंतवणूकदार सावधगिरी बाळगताना दिसले.Nifty at record closing high of 22,197

सेन्सेक्समध्ये 434 अंकांची घसरण

यूएस फेडच्या शेवटच्या बैठकीचे मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी, बुधवारी भारतीय बाजार सलग सहा सत्रांचा तेजीचा सिलसिला तोडताना दिसला.आयटी,ऑइल आणि गॅस, पॉवर व मेटल या क्षेत्रातील नफावसुलीने बाजाराला खाली ढकलले. यूएस व्याजदरात लवकरच कोणतीही कपात होण्याची अपेक्षा कमी असल्यामुळे आयटी आणि ऊर्जा समभागांमध्ये जास्त घट झाली. सेन्सेक्स जवळपास 600 अंकांनी गडगडला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये देखील मोठी घसरण झाली. Sensex sinks 434 pts

खालच्या पातळीवरून जोरदार पुनरागमन, सेन्सेक्स 535 अंकांनी वधारला

संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बाजाराने सपाट सुरुवात केली. परंतु थोड्या वेळाने नफा वसुलीमुळे बाजाराने मागील सत्रातील घसरणीला पुढे नेले आणि निफ्टीला 21,900 च्या खाली खेचले.परंतु अस्थिर अश्या सत्रात शेवटच्या तासात खालच्या पातळीवरून बाजारात खरेदी झाल्याने तेजी दिसून आली. सर्व क्षेत्रांतील खरेदीच्या जोरावर निफ्टीने 22,252.50 चा नवा विक्रमी स्तर नोंदवला.निफ्टीने दिवसाच्या नीचांकी स्तरावरून 375 अंकांची वाढ घेतली . तर सेन्सेक्समध्ये 1150 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली. Sensex gains 535 points on sharp pullback

नवीन उच्चांक गाठल्यानंतर बाजाराचा सपाट बंद

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी बाजार तेजीत उघडला निफ्टीने 22,297 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला. परंतु जीडीपी (GDP) आकडे आणि इतर डेटा जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध झाले तसेच गुंतवणूकदारांनी लाँग पोझिशन्स घेणे टाळले आणि बाजारात नफावसुली होताना दिसली. Markets end flat
after hitting new highs

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)

jiteshsawant33@gmail.com
 

ML/KA/PGB
25 Feb 2024

.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *