अनुकूल संकेतांमुळे निफ्टीने ५२ आठवड्यांचा उच्चांक केला पार
मुंबई,दि. १४ (जितेश सावंत) : यूएस मधील महागाईच्या आकडेवारीतील कूल-ऑफ,रुपयातील वाढ ,जागतिक बाजारांचे जोरदार पुनरागमन, FII ची खरेदी,आणि भारतीय कंपन्यांचे मजबूत तिमाही निकाल या पार्श्वभूमीवर सलग चौथ्या आठवड्यात बाजारात वाढ झाली.11 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार 1 टक्क्यांहून अधिक वाढला.निफ्टीने 52 आठवड्यांचा उच्चांक ओलांडला.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष १४ नोव्हेंबर रोजी भारताचे wpi inflation ,cpi data, eurozone iip data, १५ नोव्हेंबर रोजी जाहीर होणारे चीनचे residential property sales,retail sales,जपानचे 3Q GDP चे आकडे याकडे असेल.
मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने १८,३००चा टप्पा पार केला. Technical view on nifty- तांत्रिकदृष्ट्या निफ्टीकरिता १८,३८२ चा टप्पा पार करणे जरुरी आहे. हा टप्पा पार केल्यास निफ्टी १८४००-१८४५८चे स्तर गाठेल. निफ्टीसाठी १८,२५९-१८,११७ हे स्तर सपोर्टचे काम करतील हे तोडल्यास निफ्टी १८०१७-१७,९५९-१७,८९९ ची पातळी गाठेल.
IIP grows 3.1% in September
शुक्रवारी जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सप्टेंबर महिन्यात ३.१ टक्के नोंदविण्यात आला.
Moody’s Slashes India’s Growth Forecast For 2022 To 7% from 7.7%.
चालू वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७ टक्के राहण्याचा खालावलेला अंदाज पतमानांकन संस्था ‘मूडीज’ने शुक्रवारी जाहीर केला.
सेन्सेक्स व निफ्टीचा बढत घेऊन बंद.Sensex, Nifty End With Gains
बँकिंग क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपेक्षेपेक्षा चांगले निकाल व शुक्रवारी अमेरिकन बाजारांनी केलेले जोरदार प्रदर्शन या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात गॅप अप ओपनिंगने झाली. परंतु लगेचच बाजारात नफावसुली झाली बाजाराने दुपारच्या सत्रात इंट्रा-डे नीचांक गाठला परंतु स्मार्ट रिकव्हरी करून बाजाराने दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद दिला.मजबूत FII खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये झालेल्या तीव्र घसरणीने व सलग दुसऱ्या सत्रात FII ने खरेदी सुरू ठेवल्याने गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळाले. सोमवारच्या सत्रात PSU बँकांनी आघाडी घेतली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 235अंकांनी वधारून 61,185 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 86अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,203.चा बंद दिला.
निफ्टीचा १८,१५० च्या जवळ.Nifty ends near 18,150
संमिश्र जागतिक संकेत असूनही बुधवारी भारतीय बाजार सकारात्मक नोटवर उघडले तथापि दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतसा निर्देशांकांचा नफा पुसत गेला आणि सेन्सेक्स 61,000 च्या खाली घसरला.परंतु PSU बँकांच्या पाठिंब्यामुळे निर्देशांक 61,000 च्या वर आणि निफ्टी 18,150 च्या आसपास बंद झाला. मार्केटने दोन दिवसांची विजयाची मालिका तोडली.सगळ्यांचे लक्ष या आठवड्यात अपेक्षित महागाईच्या आकडेवारीवर होते.वीकली एक्सपायरीच्या अगोदर बाजारात दबावाचे वातावरण होते.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 151अंकांनी घसरून 61,033 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 45 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,157 चा बंद दिला.
सेन्सेक्स ४२० अंकांनी घसरला. Sensex falls 420 pts
जागतिक बाजारातील मंदावलेल्या संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात गुरुवारी विकली एक्सपायरीच्या दिवशी विक्री पाहावयास मिळाली. ऑटो आणि पीएसयू बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात नफावसुली पहावयास मिळाली. मिड आणि स्मॉल कॅपमध्ये देखील विक्रीचा मारा झाला.जगभरातील गुंतवणूकदार यूएस महागाईच्या डेटाची वाट पाहत होते. यामुळेच मार्केटमध्ये गुंतवणूकदारानी थोडी सावध भूमिका घेतल्याचे दिसले.सलग दुसऱ्या सत्रात बाजारात घसरण झाली.सेन्सेक्समध्ये ६०० अंकांपेक्षा अधिकची घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 419 अंकांनी घसरून 60,613 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 128 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,028 चा बंद दिला.
सेन्सेक्स १,१८१अंकांनी वधारला.Sensex gains 1,181 points
यूएस मधील महागाईच्या आकडेवारीतील कूल-ऑफ,रुपयातील वाढ आणि सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी निफ्टीने 52 आठवड्यांचा उच्चांक ओलांडला. सेन्सेक्सने १,२०० अंकांची उसळी घेतली. दिवसभरात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी50 ने अनुक्रमे 61,840.97 आणि 18,362.30 चा उच्चांक गाठला.देशांतर्गत बाजारातील रॅलीचे नेतृत्व आयटी समभागांनी केले. निफ्टी50 ने 18,350.95 चा 52 आठवड्यांचा उच्चांक ओलांडला ,तर सेन्सेक्स 52 आठवड्यांच्या उच्चांकापासून 404 अंक दूर राहिला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 1,181 अंकांनी वधारून 61,795 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 321.अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,349 चा बंद दिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com
JS/KA/SL
12 Nov. 2022