भांडवली बाजारात बुल्सचा(Bulls) जलवा कायम.सेन्सेक्स व निफ्टीने नवी शिखरे केली काबीज.

 भांडवली बाजारात बुल्सचा(Bulls) जलवा कायम.सेन्सेक्स व निफ्टीने नवी शिखरे केली काबीज.

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बाजार नव्या शिखरावर. या आठवडयात बाजारावर जागतिक संकेत, GDP चे आकडे,GST चे आकडे (GST collection) फेड चेअरमन Jerome Powells यांचे जाहीर झालेले मत या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी.

सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजार १% पेक्षा अधिक वाढला आणि नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला. Markets gain over 1% and close at fresh record highs amid positive global cues

सोमवारी जागतिक बाजारात तेजीचे वातावरण होते. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांनी दिलेल्या माहितीनंतर शुक्रवारी अमेरिकन बाजारात विक्रमी तेजी झाली. पॉवेल यांच्या सांगण्यानूसार फेड सध्या तरी  व्याज दर वाढवण्याची शक्यता नाही. याच बातमीमुळे जागतिक बाजारात तेजीचे वातावरण पसरले. व त्याच पावलावर पाऊल टाकत भारतीय बाजारात विक्रमी तेजी झाली बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला,बाजार उघडताच निफ्टीने १६,८०० चा टप्पा पार केला. बाजारावर तेजीवाल्यांची चांगलीच पकड होती. दिवसभरात सेन्सेक्सने ८०० अंकांची उसळी घेतली व निफ्टीने १६,९०० चा टप्पा पार केला. डॉलरच्या तुलनेत रुपयात देखील मजबुती होती. दिवसभरातील कामकाजात Bharti Airtel, Divis Labs, Axis Bank, Tata Steel आणि Coal India ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व  Tech Mahindra, Eicher Motors, Nestle, Infosys आणि TCS ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ७६५ अंकांनी वधारून ५६,८८९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २२५ अंकांनी वधारून १६,९३१ चा बंद दिला.

सलग दुसऱ्या दिवशी बाजारात विक्रमी तेजी. Markets rise to record high levels for the second consecutive day.

मंगळवारी बाजाराची सुरुवात नवीन उच्चांकाने झाली सेन्सेक्सने प्रथमच ५७,००० चा टप्पा पार केला. बाजाराने विक्रमी परंपरा सुरूच ठेवली.ऑगस्ट महिन्यात १३ वेळा  बाजाराची सुरुवात नवीन विक्रमी उच्चांकाने झाली.मिडकॅप आणी स्मालकॅप समभागात सुद्धा तेजीचे वातावरण होते. २०२१ मध्ये सेन्सेक्समध्ये  आत्तापर्यंत २१% व निफ्टीत १९% इतकी वाढ झाली. दिवसभरात निफ्टीने प्रथमच १७,००० चा टप्पा पार केला. १९ सत्रात निफ्टीने १६,०००ते१७,००० चा टप्पा पार केला.आत्तापर्यंत सगळ्यात कमी वेळेत १००० अंकांचा टप्पा पार केला. निफ्टीच्या १७,००० या प्रवासात RIL, TCS, HDFC यांचा मोठा हातभार आहे. ऑगस्ट महिन्यात महीने  Bajaj Finserv, Tech Mah, TCS या समभागात खूप वाढ झाली. तसेच IT इंडेक्सचे प्रदर्शन जोरदार झाले. दिवसभरातील कामकाजात Bharti Airtel, Bajaj Finance, Eicher Motors, Hindalco Industriesआणि Shree Cements ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व  Tata Motors, Nestle, IndusInd Bank, Reliance Industries आणि BPCL ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६६२ अंकांनी वधारून ५७,५५२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २०१ अंकांनी वधारून १७,१३२ चा बंद दिला.

मंगळवारी संध्याकाळी केंद्र सरकारने, चालू वित्त वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीनंतर GDP चे निकाल जारी केले. पहिल्या तिमाहीचा GDP चा  विकास दर २०. १ टक्के असा जाहीर झाला.India’s gross domestic product (GDP) surged 20.1% in the April-June quarter of the current fiscal.

बाजारात वरच्या स्तरावर नफावसुली. Sensex, Nifty fails to hold record levels amid profit-booking

बुधवारी जागतिक बाजारातील संकेत संमिश्र होते. भारतीय बाजाराची सुरुवात नवा विक्रम नोंदवून झाली.सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ५७,९१८ व १७,२२५ चा नवा विक्रमी स्तर स्थापित केला.वरच्या स्तरावर नफावसुली झाल्याने बाजार काहीसा घसरला.दिवसभरातील कामकाजात Asian Paints, Tata Motors, SBI Life Insurance, Axis Bankआणि Nestle ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व  M&M, Cipla, Tata Steel, Hindalco Industries आणि Bajaj Finserv ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स २१४ अंकांनी घसरून ५७,३३८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २०१ अंकांनी घसरून १७,०७६ चा बंद दिला.

GDP नंतर जाहीर झालेल्या GST च्या आकडयांमुळे अर्थव्यवस्थेत सुधरा होत असल्याचे संकेत मिळाले.ऑगस्ट महिन्यातील GST वसुली १लाख १२ हजार रुपये झाली. GST collection in August at over Rs 1.12 trillion

आयटी व एफएमसीजी शेअर्समधील वाढीमुळे सेन्सेक्स व निफ्टीचा विक्रमी बंद. Sensex, Nifty Close At Record Aided By Gains In I.T., FMCG Stocks

गुरुवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली. परंतु पुन्हा एकदा बुल्सनी(Bulls) आपला जलवा दाखवला. बाजारावर त्यांनी आपली पकड मजबूत केल्याने विकली एक्सपायरी च्या दिवशी निफ्टीने १७,१४५ चा  विक्रमी उच्चांक स्थापित केला.मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात देखील तेजी होती.बाजार बंद होताना सेन्सेक्स ५१४ अंकांनी वधारून  ५७,८५२ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५७ अंकांनी वधारून १७,२३४ चा बंद दिला.

Nifty Registers Best Weekly Gain Since February. निफ्टीने फेब्रुवारीनंतर सर्वोत्तम साप्ताहिक नफा कमवला

आठवडयाच्या शेवटच्या दिवशी व सप्टेंबर सिरीजच्या सुरुवातीलाच बाजाराची सुरुवात विक्रमानेच झाली सेन्सेक्सने प्रथमच ५८,००० चा टप्पा पार केला. मिडकॅप इंडेक्सने सुद्धा विक्रमी स्तर नोंदवला. आकडा पार केला. निफ्टीने सुद्धा नवीन विक्रमी स्तर गाठला. सेन्सेक्सने ५८,१४० व निफ्टीने १७,३२१ चा सर्वोच्च विक्रमी स्तर नोंदवला. बाजारावर पुन्हा एकदा बुल्सची(Bulls) पकड मजबूत असल्याचे दिसले. निर्देशकांच्या विक्रमासाठी  Reliance Industries, Infosys,आणि Titan यांचे योगदान मोलाचे राहिले. सेंसेक्स व निफ्टीने विक्रमी बंद दिला.बाजार बंद होताना सेन्सेक्स २७७ अंकांनी वधारून  ५८,१२९  या स्तरावर बंद झाला व निफ्टी ८९ अंकांनी वधारून १७,३२३ चा बंद दिला. Bulls continue to rise in capital markets. Sensex and Nifty hit new highs.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com

JS/KA/PGB
4 Sep 2021

mmc

Related post