महाराष्ट्र, कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी NIA चे छापे

 महाराष्ट्र, कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी NIA चे छापे

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

आयसीसशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएकडून ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण मध्ये ३१ तर ठाणे शहरात ९ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तर भाईंदरमध्ये एका ठिकाणी, पुणे २ आणि कर्नाटकमध्ये एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून शेकडो संशयितांची चौकशी सुरू आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. अल- कायदा आणि दहशदवादी संघटनांशी संबंध आणि दहशतवादी कट आणि कट रचण्यासाठी तरुणांना भडकवण्याच्या प्रकारांसंबंधी गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई सुरू केली आहे. पकडण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांकडून पॅलेस्टाईनचा झेंडा, धारधार शस्त्रे, तलवारी, हार्ड डिस्क आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

SL/KA/SL

9 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *