राज्यभरात NIA चे छापे, सहाजणांना अटक

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दिवसांपासून NIA चं मॉड्यूल महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. या मोड्यूलचा भाग म्हणून आज भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली आहे. त्याच आज भिवंडीतील पडघा येथे छापेमारी करण्यात आली. आयएसआयशी संबध असल्या प्रकरणी अकीब नाचन यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. अकीब नाचन (Aqib Nachan) याला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ATS आणि NIA कडून सध्या महाराष्ट्रात (NIA Raid Bhiwandi) छापेमारी केली (Maharashtra ATS, NIA module) जात आहे. एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झालं आहे.
यापूर्वी पाच जणांना NIA ने अटक केली आहे. त्यात मुंबईतून एक, पडघ्यातून दोन, पुण्यातून दोन अशा पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. भिवंडीतील पडघ्यातून अटक केलेले झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे पडघ्यात भाड्याने राहत होते. या दोघांना अकीब नाचन याने आर्थिक मदत केल्याचा दावा NIA ने केला आहे. त्यामुळे अकीब नाचन याच्या घरावर NIA ने छापेमारी करुन त्याला ताब्यात घेतलं आहे.
अकीब नाचन याला गुजरात ATS ने 2022 मध्ये ताब्यात घेतलं होतं. ISIS च्या काही संस्था आहेत त्यातील अल सुफा या संघटनेशी त्याचा संबंध होता. त्यानंतर 2023 मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती.
झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी आणि अब्दुल कादिर पठाण या चार आरोपींच्या सहकार्याने आकीफ, आयएसआयएस या नियुक्त विदेशी दहशतवादी संघटनेच्या दहशतवादाशी संबंधित क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे आढळून आले. एटीएस पुणे) यांच्यासह इतर काही संशयित. ‘सुफा दहशतवादी टोळी’चे सदस्य इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी हे फरार होते आणि एप्रिल 2022 मध्ये राजस्थानमधील एका कारमधून स्फोटके जप्त केल्याप्रकरणी एनआयएने त्यांना ‘मोस्ट वॉन्टेड’ घोषित केले होते.
SL/KA/SL
5 July 2023