NIA चे देशभर ६ राज्यात १०० ठिकाणी छापे

 NIA चे देशभर ६ राज्यात १०० ठिकाणी छापे

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) या केंद्रीय दहशतवाद विरोधी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने आज देशातील ६ राज्यांमध्ये १०० ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात या सहा राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्करी याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशात बसलेले गुंड खलिस्तानी फुटीरतावाद्यांना निधी देऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. 100 पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयए टीमचे 200 हून अधिक सदस्य सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दहशतवाद, अंमली पदार्थ तस्कर आणि गँगस्टरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीच्या साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात येत आहे.

लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीतील सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून हा छापा टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या छाप्यात एनआयएने 70 हून अधिक मोबाईल जप्त केले होते. या मोबाईलमध्ये ड्रग नेक्सस आणि लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीशी संबंधित लोकांची अनेक गुपिते समोर आली होती.

SL/KA/SL

17 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *