पुण्यातून फरार झालेल्या दहशतवाद्याला NIA ने केले जेरबंद

पुणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ला मोठं यश मिळालं आहे. पुण्यातून फरार झालेला मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहनवाज आलम याला झारखंडमधून अटक करण्यात आली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे. शाहनवाझ आलम हा गेल्या 3 महिन्यांपासून फरार होता.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील फरार झालेला दहशतवादी शाहनवाझ आलम याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दहशतवादी सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात आहे. शाहनवाझ आलम हा 3 महिन्यांपूर्वी पुण्यातून पसार झाला होता. NIA ने या दहशतवाद्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे. दहशतवादी शाहनवाझ आलम याला झारखंडमधून अटक झाली आहे. स्फोटके बनवण्याचे प्रशिक्षण देणे, ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणे असा आरोप शाहनवाझ आलम याच्यावर आहेत.

SL/KA/SL

3 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *