राज्यातील कंत्राटी एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप…

पुणे दि ९ — राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचम) राज्यात सुमारे ३० हजारांहून अधिक तर पुण्यातील १४०० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. समायोजन व वेतनवाढीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसह अन्य १८ मागण्यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या एकत्रीकरण समितीने १९ ऑगस्टपासून संप पुकारला आहे.
पुण्यातही औंध जिल्हा रुग्णालयात या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत राज्य सरकारने आपल्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी केली आहे. राज्यभरातील सुमारे २५ ते ३० हजार कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात १९ ऑगस्टपासून सहभागी. पुण्यातील १५००. तांत्रिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, 14 मार्च 2024 रोजी शासन निर्णय (GR) काढण्यात आला. ज्यामध्ये १० वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना रिक्त पदाच्या ३० टक्के याप्रमाणे कायम सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात झाला होता. आता १८ महिने उलटूनही याची अंमलबजावणी झाली नाही.
सध्या आरोग्य विभागातील 50 टक्के कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. ML/ML/MS