वाचन चळवळीसाठी राज्यात नवी सात हजार वाचनालये

 वाचन चळवळीसाठी राज्यात नवी सात हजार वाचनालये

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे साडे अकरा हजार ग्रंथालयं असून नव्यानं सहा ते सात हजार ग्रंथालयं सुरु करण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला ते उत्तर देत होते.

यानुसार ३ हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात तसंच ५०० लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावात ग्रंथालय सुरू करणं अनिवार्य होणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ग्रंथालयांना सध्या ६० टक्के अनुदान दिलं जात असून त्यात आणखी ४० टक्क्यांची वाढ केली जाईल तसंच ग्रंथालयांची दर्जोन्नती करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून ग्रंथालयांकडून ऑनलाईन माहिती मागवली जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

ML/ML/SL

4 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *