SIM Card खरेदीबाबत लवकरच लागू होणार नवीन नियम

 SIM Card खरेदीबाबत लवकरच लागू होणार नवीन नियम

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांमध्ये देशभर रस्तोरस्ती सिम कार्ड्स विकणारे स्टॉल्स फोफावले आहेत.सध्या देशात 10 लाख सिमकार्ड विक्रेते आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यांच्याकडून सिम खरेदी करणाऱ्यांची योग्य कायदेशीर पडताळणी होतेच असे नाही. त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांना वाव मिळतो.याप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम बदलले आहेत. ऑगस्ट महिन्यात हा बदल करण्यात आला. त्यानंतर हा बदल 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार होता. पण अंमलबजावणी होऊ शकली नाही. सरकारने आता हे नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमांनुसार, सिम कार्ड विक्रेत्यांना नोंदणी करण्यापूर्वी आणि सिस्टममध्ये सामील होण्यापूर्वी केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल.बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या सिमकार्ड विक्रेत्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिबंधित आणि काळ्या यादीत टाकले जाईल. या नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करता येणार आहेत. म्हणजेच अतिरिक्त सिम खरेदीवर कडक कारवाई केली जाईल.

नवीन नियमानुसार, 30 नोव्हेंबरनंतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीने कोणत्याही विक्रेत्याला नोंदणीशिवाय सिम विकण्याची परवानगी दिली. मग अशा परिस्थितीत त्याच्यावर 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. सर्व डीलर्सनी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणी प्रक्रियेत, सिम कार्ड विक्रेता आणि दूरसंचार कंपन्या यांच्यात लेखी करार आवश्यक असेल. बनावट सिम कार्ड आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नवीन नियम केले आहेत.

SL/KA/SL

27 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *