स्पीड पोस्टसाठी नवीन दरांची घोषणा

भारतीय टपाल विभागाने इनलँड स्पीड पोस्टसाठी 1 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या नवीन दरांची घोषणा केली आहे. या नवीन दरपत्रकानुसार, इनलँड स्पीड पोस्ट (डॉक्युमेंट) लोकल एरियाच्या बाहेर, देशात कोठेही पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूळ दर (Base-Price) असेल. हे दर 50 ग्रॅम पर्यंतच्या डॉक्युमेंट/पत्र/नोटीस यासाठी लागू आहेत. यानंतर अंतर वाढेल तसे दर देखील वाढत जातील. उदाहरणार्थ, मुंबईहून दिल्लीला (सुमारे 1400 किमी) 50 ग्रॅम पेक्षा जास्त आणि 250 ग्रॅम पेक्षा कमी वजनाचे कोणतेही डॉक्युमेंट किंवा पुस्तक वगैरे पाठवण्यासाठी 72 रुपये खर्च करावे लागतील.
भारतीय टपाल खात्याने स्पीड पोस्ट सेवेत नवीन बदल जाहीर केले आहेत. यामध्ये ओटीपी-आधारित सुरक्षित वितरण (OTP-Based Secure Delivery), ऑनलाईन पेमेंट सुविधा, एसएमएस-आधारित वितरण सूचना (SMS-Based Delivery Notification), सोयीस्कर ऑनलाईन बुकिंग सेवा, रिअल टाइम वितरण अपडेट्स आणि युजर्ससाठी नोंदणीची (Registration) सोय यांचा समावेश आहे.