2026 अखेरीस मुंबईत सुरु होणार नवीन टर्मिनस
मुंबई, दि. 6 : मुंबईत जोगेश्वरी येथे नवीन रेल्वे टर्मिनस उभारण्यात येत आहे. मुंबईत सध्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला टर्मिनसमधून लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. आता या टर्मिनसला आणखी एक नवे पर्ययी टर्मिनस मिळणार आहे.
जोगेश्वरी टर्मिनस या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल. प्रवाशांना तेथून प्रवास सुरू करता येईल. लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी पश्चिम रेल्वेने सातवे टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेतला होता. या टर्मिनसवर दररोज 12 जोड्या मेल/एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जातील, ज्यामध्ये दिल्ली आणि उत्तर भारताला जाणाऱ्या रेल्वेंचा समावेश आहे.
अमृत भारत स्टेशन विकास योजनेचा भाग म्हणून पश्चिम रेल्वे जोगेश्वरीमध्ये एक नवीन टर्मिनस बांधत आहे. नवीन टर्मिनसमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेची संख्या वाढण्यास मदत होईल. राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या जमिनीवर हे नवीन रेल्वे टर्मिनस बांधले जात आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी जोगेश्वरी टर्मिनस सोईस्कर पर्याय ठरणार आहे.
SL/ML/SL