अबुधाबीतील भारतीय कंपन्यांनी शोधले नवीन तेल साठे
अबुधाबी, दि. १५ : भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( BPCL ) यांनी अबुधाबीतील एका भूभागातील तेल उत्खनन ब्लॉकमध्ये नवीन तेलाचे साठे शोधले आहेत. UBPL मध्ये IOC आणि BPCL ची प्रत्येकी 50 टक्के भागीदारी आहे.
2024 च्या सुरुवातीला UBPL ने XN-76 या शोध विहिरीतपहिले तेल साठे शोधले होते. आता XN-79 02S या दुसऱ्या शोध विहिरीतही तेलाचा शोध लागला आहे. या ब्लॉकचे क्षेत्रफळ 6,162 चौरस किलोमीटर आहे. उत्खनन टप्प्यात या संयुक्त उपक्रमाने सुमारे 166 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हा उत्खनन टप्पा आता पूर्ण झाला आहे. या शोधामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे IOC आणि BPCL साठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्खनन कंपन्या म्हणून एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.