गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त

 गुजरातमधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्त

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे ; अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतिक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी पुढाकार घेतला असून सिंहांची जोडी आज उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

New Lion Pair in Sanjay Gandhi National Park

गुजरात येथून आणलेल्या सिंहांची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

वनग्रंथालयाचे भूमीपूजन आणि सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजर (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्राचे उद्घाटन यावेळी मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार गोपाल शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, सतीश वाघ, आमदार प्रकाश वाघ, प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकर्जुन, क्लामेंन्ट बेन उपस्थित होते.

आपल्या भाषणादरम्यान मुनगंटीवार म्हणाले कि, संजय गांधी उद्यानात मुक्त करण्यात आलेल्या सिंहांना भारतीय स्टेट बँकेने दत्तक घेतले याचे मनापासून कौतुक करावेसे वाटते. वनांचे काम मनापासून करा, हे ईश्वरीय कार्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ईश्वराची देण आहे; वसुंधरा म्हणजे पृथ्वीच्या जडणघडणीत देवाने आर्किटेक्ट म्हणून भूमिका निभावली, त्या अमूल्य वसुंधरेच्या संवर्धनाची जबाबदारी सारे मिळून सांभाळू या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

संजय गांधी उद्यानातील सर्वांत लहान दुर्मीळ प्रजातीच्या वाघाटी मांजराचे (रस्टी स्पॉटेड कॅट) संवर्धन केंद्र हे देशातील एकमेव संवर्धन केंद्र आहे, ते देखील आपण जपूया असे ते म्हणाले.

ML/KA/SL

7 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *