New India Bank घोटाळा प्रकरणी 12 जणांवर एफआयआर दाखल

 New India Bank घोटाळा प्रकरणी 12 जणांवर एफआयआर दाखल

मुंबई, दि. १९ : New India Cooperative Bank बॅँकेत झालेल्या २४ कोटी ९३ लाख रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार रणजित भानू, त्यांच्या मुलगा हिरेन भानू , हिरेनची पत्नी बँकेची माजी उपाध्यक्ष गौरी हिरेन भानू यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इडीने दाखल केलेला हा दुसरा एफआयआर आहे.
इडीचा असा आरोप आहे की, २०१४ ते २०२३ या कालावधीत आरोपींनी लोअर परेल स्थित परसेप्ट स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेंट या कंपनीला आवश्यक नियमांचे पालन न करता ७७ कोटी रुपयांचे कर्ज दिले.

कंपनीने कर्जाची परतफेड करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर एकरकमी कर्जफेड योजनेच्या (वन टाईम सेटलमेंट) नावाखाली मुद्दल रकमेतून कंपनीला १८ कोटी ५६ लाख रुपयांची माफी दिली. या एकरकमी कर्जफेडीसाठी कंपनीला लंडनस्थित हर्मिस स्पोर्ट्स अँड एन्टरटेन्मेंट या कंपनीने मदत केली होती. त्याबदल्यात परसेप्ट कंपनीने हर्मिस कंपनीला ६ कोटी ३७ लाख रुपये लाच दिली.अशा प्रकारे एकूण २४ कोटी ९३ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी इडीने हा एफआयआर दाखल केला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *