UGC-NET, CSIR-NET आणि NCET परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC-NET, CSIR-NET आणि NCET परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. याआधी यूजीसी-नेटची परीक्षा पेन आणि पेपरवर घेतली जात होती. यूजीसी नेट परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यासोबतच 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान संयुक्त CSIR-UGC NET परीक्षा होणार आहे. तर एनसीईटीची परीक्षा १० जुलै रोजी होणार आहे.
NTA ने 21 जून रोजी होणारी CSIR UGC NET परीक्षा पुढे ढकलली होती. ही परीक्षा 25 ते 27 जून दरम्यान होणार होती. परीक्षा पुढे ढकलण्यामागे साधनांचा अभाव हे कारण देण्यात आले. त्याच वेळी, एनटीएने अनियमिततेच्या भीतीने 19 जून रोजी यूजीसी नेट परीक्षा रद्द केली होती, तर एक दिवस आधी 18 जून रोजी पेपर घेण्यात आला होता. यापूर्वी 12 जून रोजी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (NCET) घेण्यात आली होती, ती संध्याकाळीच रद्द करण्यात आली होती.
19 जून रोजी, विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडून परीक्षेतील अनियमिततेबाबत माहिती मिळाली होती. परीक्षा आयोजित करताना प्रामाणिकपणा पाळला गेला नाही हे प्रथमदर्शनी सूचित होते, असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले होते. यानंतर, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) ती रद्द करण्याचे आदेश दिले होते. केंद्राने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले आहे.
SL/ML/SL
29 June 2024