हे आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे कोच

 हे आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे कोच

मुंबई,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  दोन महिन्यांपूर्वी चषक जिंकून भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रिकेटप्रेमींचे मन जिंकून घेतले आहे. या संघाच्या व्यवस्थापनाकडे आयसीसी आता विशेष लक्ष देऊन महत्त्वाचे बदल करत आहे.

आता महिला संघाचे बॅटींग कोच म्हणून माजी फलंदाज ऋषिकेश कानिटकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या T-20 मालिकेसाठी सज्ज होणार आहे.

गुणवत्तापूर्ण खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी मिळणे ही अतिशय सन्मानाची बाब असल्याचे मत ऋषिकेश कानिटकर यांनी व्यक्त केले आहे.

महिला संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याकडे राष्ट्रीक क्रिकेट अॅकॅडमी ची जबाबदारी देण्यात आली आहे.

SL/KA/SL

6 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *