न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे ५२ वे सरन्यायाधीश, १४ मेला घेणार शपथ

भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये भूषण गवई ज्येष्ठ असून पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे. १४ मे रोजी ते शपथ घेणार आहेत.