हे आहेत RAW चे नवीन प्रमुख
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय गुप्तचर संस्थेच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) च्या प्रमुखपदी IPS रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८८ च्या बॅचमधुन छत्तीसगड कॅडेरमध्ये IPS सेवेत रुजू झालेल्या सिन्हा यांची ही नियुत्ती २ वर्षांसाठी असणार आहे. १ जुलैपासून रवि सिन्हा पुढची दोन वर्षे रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील.
रवि सिन्हा आत्तापर्यंत कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव या पदावर कार्यरत होते. सध्याचे रॉ चीफ सामंत गोयल यांच्या जागी आता सिन्हा यांची नियुक्ती घोषित करण्यात आली आहे. सामंत गोयल हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर रवि सिन्हा या पदावर बसतील आणि पुढची दोन वर्षे रॉचे प्रमुख म्हणून काम करतील.
चीन आणि भारत यांच्यात काहीसं तणावाचं वातावरण असताना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही रवि सिन्हा यांना देण्यात आली आहे. गुप्त माहिती आधुनिक तंत्राच्या मदतीने काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. रवि सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष पदावर कार्यरत आहेत. कॅबिनेटने त्यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवली आहे.
SL/KA/SL
19 June 2023