नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) पदी यांची नियुक्ती

 नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) पदी यांची नियुक्ती

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून IAS अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पाच वर्षांसाठी झाली आहे. या पदावर नियुक्ती होणारे ते पहिले आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील केएसआर मूर्ती हेही सनदी अधिकारी होते. भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ २० नोव्हेंबर रोजी संपला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मुर्मू यांची देशाचे महालेखापाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.याआधी मुर्मू हे जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते.

यानंतर आता के.संजय मूर्ती हे त्यांचा पदभार स्विकारणार आहेत.के. संजय मूर्ती हे सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव आहेत. संजय मूर्ती हे हिमाचल प्रदेश केडरचे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.मूर्ती हे लवकरच ‘कॅग ‘ म्हणून आपला पदभार ग्रहण करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असतानाच त्यांची ‘कॅग’ म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यांच्या या कारकिर्दीत नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आखले गेले.

SL/ML/SL

21 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *