राज्यात सोलर सिस्टीमवरील नवी 75 नाट्यगृहे

सांगली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अल्पपदरात नाट्य रसिकांना नाटकाचे प्रयोग बघता यावेत यासाठी, राज्यात सोलर सिस्टीम
वरील वातानुकूलित अशी 75 नाट्यगृहे उभी केली जाणार आहेत. शिवाय आत्ता जी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असलेली 86 नाट्यगृहे सुद्धा अद्यावत केली जाणार आहेत अशी माहिती, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मुहूर्तमेढ सोहळा नाट्य पंढरी, सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी मंत्री मुनगंटीवार हे बोलत होते.
अखिल भारतीय मराठी नाट्यसमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, कामगारमंत्री, सुरेशभाऊ खाडे, खासदार संजय पाटील , अभिनेते विजय गोखले, मेघराज राजे
भोसले, मिलिंद जोशी, प्रशांत दामले आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासहित अन्य मान्यवर आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधी पक्षातील काही लोक संदिग्धता निर्माण करण्याचे पाप करत असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात तीन वर्षासाठी आणली जाणार आहेत, ती भारतात आल्यानंतर कायमस्वरूपी याच ठिकाणी असावीत यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.
राम मंदिराच्या जागेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या सोबत संजय राऊत गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षा जनतेने किंवा पत्रकारांनी करू नये, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. New 75 theaters on solar system in the state
ML/KA/PGB
29 Dec 2023