सिंहगड रोडवर साकारतेय भव्य नेत्र रुग्णालय. रविवारी होणार उद्घाटन

 सिंहगड रोडवर साकारतेय भव्य नेत्र रुग्णालय. रविवारी होणार उद्घाटन

पुणे, दि २२: सिंहगड रोड परिसरात आरोग्यसेवेच्या सुविधेत भर घालत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन येत्या रविवारी, २४ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. माणिकबाग पेट्रोल पंपाशेजारील गल्लीमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या या नेत्ररुग्णालयाचा भव्य सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

या प्रसंगी महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण, चेतनजी तुपे तसेच वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पाठारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र उभारण्यात आले असून डोळ्याच्या विविध विकारांचे निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची सुविधा येथे आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. रुग्णांशी सहानुभूतीपूर्ण वर्तन आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे या रुग्णालयाने विशेष विश्वास संपादन केला आहे. डॉ. दूधभाते यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून नेत्रसेवेसाठी त्यांचे योगदान लक्षणीय मानले जाते. या रुग्णालयामुळे सिंहगड रोड परिसरासह पुणेकरांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मिळणार असल्याची अपेक्षा आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *