नेपाळी नागरिकांना पुन्हा हवी आहे राजेशाही

काठमांडू, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळमधील शतकानुशतके असलेली राजेशाही संपून लोकशाही राजवट येऊन आता सतरा वर्ष होऊन गेली आहेत. तरीही आताही तेथील नागरीकांना राजशाही बद्दल अजूनही आस्था असल्याचे चित्र दिसत आहे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शहा काल कडक बंदोबस्तात काठमांडूत दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी राजेशाही समर्थक कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते. ज्ञानेंद्र पोखरा येथून सिमरिक एअरच्या हेलिकॉप्टरने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह शेकडो समर्थकांनी त्यांच्या बाजूने घोषणाबाजी केली.
ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव हे नेपाळचे माजी आणि शेवटचे राजे आहेत, जे २००१ ते २००८ पर्यंत राज्य करत होते, जेव्हा राजेशाही संपली.
SL/ML/SL
10 March 2025