दिल्लीतील नेहरू स्टेडियम तोडून होणार ‘स्पोर्ट्स सिटी’
नवी दिल्ली, दि. १० : दिल्लीतील सर्वात जुन्या स्टेडियमपैकी एक असणारं जवाहर लाल नेहरू स्टेडियम जमीनदोस्त करुन तिथे ‘स्पोर्ट्स सिटी’ बनवली जाणार आहे. हा प्रोजेक्ट 102 एकरच्या मोठ्या क्षेत्रात पसरलेला असेल. या नव्या स्पोर्ट्स सिटीच्या निर्माणासाठी कतार आणि ऑस्ट्रेलिया सारख्या शहरांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या आधुनिक खेळ मॉडलचं आकलन केलं जाईल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमला 1982 च्या एशियन गेम्ससाठी बनवण्यात आलं होतं. त्यानंतर 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनासाठी याला रिनोव्हेट करण्यात आलं. हे स्टेडियम भारतासाठी बऱ्याच काळापासून सर्वात प्रसिद्ध बहु-क्रीडा स्थळांपैकी एक राहीलं. जवळपास 60 हजार लोकांची कपॅसिटी असणाऱ्या या स्टेडियममध्ये मोठे एथलेटिक्स इवेंट, फुटबॉल सामने, मोठे कॉन्सर्ट आणि अनेक राष्ट्रीय कार्यक्रम झाले. यात स्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमाचा सुद्धा समावेश आहे. हे स्टेडियम ऐतिहासिकदृष्ट्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स संघाचे होम व्हेन्यू राहिले आहे आणि चार दशकांहून अधिक काळ भारताच्या क्रीडा इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे.
SL/ML/SL