भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती दिनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विनम्र अभिवादन.
पुणे, दि १४
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटचे अरविंद शिंदे यांच्या हस्ते आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘पं. जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होतेच पंरतु थोर स्वातंत्र्यसेनानी देखील होते. आयुष्यातली ११ ते १३ वर्षे त्यांनी इंग्रजांविरूध्द लढताना तरूंगात घालवली. यावेळी त्यांच्या पत्नी आजारी असताना देखील देशाच्या स्वातंत्र्याला प्राधान्य दिले. त्याचबरोबर नेहरूंचे संपूर्ण कुटूंब हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते. पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत देशाला आधुनिक तंत्रज्ञानाकडे घेवून जाण्याचा पाया त्यांनी रचला. लहान मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते व मुले आवडीने त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणायचे. अशा या थोर स्वातंत्र्य सेनानी व देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना विनम्र अभिवादन. आद्यक्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीकारक घडवून दिले. त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांचा यात समावेश होतो. मुलींच्या व बहुजनांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या महात्मा फुल्यांना त्याकाळी काही ठरावीक समाजाच्या लोकांनी त्रास द्यायचे काम केले त्यावेळेस लहुजी वस्ताद यांनी त्यांच्या अंगरक्षकाची भूमिका बजावली.’’
यानंतर पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्षा सौ. प्राची दुधाने व महिला काँग्रेसच्या ॲड. राजश्री अडसुळ यांची भाषणे झाली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, अजित दरेकर, रफिक शेख, कमल व्यवहारे, मेहबुब नदाफ, अविनाश साळवे, नितीन परतानी, राज अंबिके, सुनिल घाडगे, राजेश मोहिते, संगीता क्षिरसागर, अनिता धिमधिमे, देवीदास लोणकर, भारत इंगुले, चंद्रकांत नार्वेकर, भगवान कडू, फिरोज शेख, सुरेश नांगरे, कुणाल राजगुरू, अरुण धिमधिमे, मंगेश भोसले, भुषण पाटोदकर, मंगेश मोहिते आदी उपस्थित होते.KK/ML/MS