नीरज चोप्राने जिंकले डायमंड लीगचे विजेतेपद

 नीरज चोप्राने जिंकले डायमंड लीगचे विजेतेपद

दोहा, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा ऑलिंम्पिक विजेता स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने काल दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेकत डायमंड लीगवर आपले नाव कोरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेच दुसऱ्या स्थानावर राहिला.

नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग मीटमध्ये ८८.६७ मीटर फेक करून पुरुषांची भालाफेक स्पर्धा जिंकली. भारतीय खेळाडूने पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम आकडा गाठला. यासह नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने ८८.६७ मीटर फेक करून पहिले, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजने ८८.६३ मीटर फेकसह दुसरे, तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८५.८८ मीटर फेकसह तिसरे स्थान पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८८.६७ मीटर भालाफेक करताना ग्रेनाडाचा पीटर अँडरसन व झेक प्रजासत्ताकचा व्हॅल्देच याकुब या कट्टर स्पर्धकांना मागे टाकले. दुसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजचा भाला ८६.०४ मीटर लांब जाऊ शकला, परंतु तो अव्वल स्थानावरच होता. तिसऱ्या प्रयत्नात गोल्डन बॉय नीरज चोप्राचा भाला आणखी कमी दूर गेला अन् त्याला ८५.४७ मीटर पर्यंतच भालाफेकता आला. दुसऱ्या प्रयत्नात याकुब ८८.६३ मीटर भालाफेकून नीरजच्या जवळ पोहोचला होता. मात्र, अजूनही भारताचा नीरज चोप्रा हा वर्ल्ड लीडसह आघाडीवरच होता.

दोहा येथे होणारी ही स्पर्धा डायमंड लीग मालिकेतील पहिला टप्पा आहे. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये डायमंड लीग फायनलसह समारोप होणार आहे. डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रत्येक खेळाडूला प्रथम क्रमांकासाठी ८, द्वितीय क्रमांकासाठी ७, तृतीय क्रमांकासाठी ६ आणि चौथ्या क्रमांकासाठी ५ गुण दिले जातात. नीरज हा सध्याचा डायमंड लीग चॅम्पियन आहे. नीरजची वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी ८९.९४ मीटर आहे, जो राष्ट्रीय विक्रमही आहे.

SL/KA/SL

6 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *