नीरज चोप्राने केले झोकात पुनरागमन, मिळवले पहिले स्थान

 नीरज चोप्राने केले झोकात पुनरागमन, मिळवले पहिले स्थान

नवी दिल्ली, १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीगमध्ये ८७.६६ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने पाचव्या प्रयत्नात हे सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत नीरजची सुरूवात काही खास नव्हती. त्याचा पहिला थ्रो फाऊल झाला पण त्यानंतर नीरजने जोरदार पुनरागमन करत जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेजे यांना मागे टाकून पहिले स्थान पटकावले.या मोसमातील दुसरे डायमंड लीग विजेतेपद जिंकण्याच्या पहिल्या प्रयत्नात नीरजने सनसनाटी पुनरागमन केले.

नीरज चोप्राचे हे ८वे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. याआधी त्याने आशियाई खेळ, दक्षिण आशियाई खेळ आणि ऑलिम्पिक यांसारख्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. तर यावर्षी नीरज चोप्राच्या खात्यात हे दुसरे सुवर्णपदक आले आहे. यापूर्वी नीरजने दोहा डायमंड लीगमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.

SL/KA/SL

1 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *