नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना जाहीर ….

सांगली दि ३ : नाट्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनी या पुरस्काराचा वितरण होणार आहे. मानपत्र, 25 हजार रुपये रोख रक्कम शाल श्रीफळ आणि गौरव पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींना गेल्या 83 वर्षापासून अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगलीच्या वतीने विष्णुदास भावे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शरद कारळे यांनी ही माहिती दिली.ML/ML/MS