राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज
गुरुवार, दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२५ रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (४) शिवदर्शन साठये, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव, विजय कोमटवार, संचालक, वि.स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी, उप सभापती डॉ. निलम गोन्हे यांनी सर्वांना विजयादशमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *