पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार डॉ.नीलम गोर्हे यांना जाहीर

मुंबई दि २२– आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू केला आहे.

पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम ताई गोर्हे. यांना जाहीर करण्यात येत आहे. त्यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी केलेले सामाजिक, राजकीय आणि साहित्य विषयक कार्य यांची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. हा पुरस्कार शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सकाळी राजे भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून विजय बापू शिवतारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम विजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या प्रसंगी दिलीप दादा बारभाई व सुदामाप्पा इंगळे रोहिदास कुंभार, माणिकराव झेंडे पाटील , मंगेश घोणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार डॉक्टर मेधा पुरव-सामंत यांना देण्यात आला होता. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी जेजुरी व परिसरातील नागरिक आजी-माजी महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी केले आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *