सभागृहातील गैरवर्तनाबद्दल राष्ट्रवादीचे जयंत पाटील विधानसभेतून निलंबित
नागपूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दिशा सलीयन प्रकरणी चौकशी जाहीर केल्यानंतर विरोधी सदस्यांनी जोरदार गदारोळ केला , त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आले.NCP’s Jayant Patil suspended from Assembly for misbehavior in the House
सालियान चौकशी प्रकरणी बोलू द्यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली, अध्यक्षांनी ती अमान्य केली, त्याने गदारोळ झाला, विरोधक संतप्त झाले, जागा सोडून पुढे आले.
या गदारोळात अजित पवार यांनी ठाकरे गटाला बोलू द्यावे अशी मागणी केली, अध्यक्षांनी ती अमान्य केली, त्यावर जयंत पाटील यांनी निर्लज्जपणे कामकाज रेटू नका असे म्हटल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाले, त्यांनी जयंत पाटील यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली , त्यावर सत्तारूढ सदस्यांनी जागा सोडल्या , सभागृहात वातावरण तंग झालं आणि त्यावर कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे सदस्यस्त्व चालू अधिवेशन काळासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानकार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि तो विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्यांच्या या वक्तव्याबद्दल चौकशी करण्यासाठी आचरण समिती गठित करण्याची ठरावात तरतूद केली आहे.
जयंत पाटील यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही, असा प्रकार घडायला नको होता , आम्ही यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला, अजाणतेपणी असा शब्द जाऊ शकतो, त्यांच्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अशी भूमिका अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आणि निलंबनाच्या कारवाई विरोधात सभात्याग करत असल्याचे जाहीर केले.NCP’s Jayant Patil suspended from Assembly for misbehavior in the House
ML/KA/PGB
22 Dec .2022