राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण.

महाड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात किल्ले रायगडावरील राज सदरेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी वाजविणारा मनुष्य या निवडणूक चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुमनताई पाटील, राजेश टोपे यांच्यासह सर्व आमदार खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. NCP Sharad Chandra Pawar party symbol unveiled at Raigad fort.
ML/KA/PGB
24 Feb 2024