राष्ट्रवादी आमदारांची आज पुन्हा पवार भेट

 राष्ट्रवादी आमदारांची आज पुन्हा पवार भेट

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर काल पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि आज पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी त्यांची भेट घेतली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लागोपाठ दोन दिवस या भेटी झाल्या . पक्षात फूट पडू नये तो एकसंध रहावा यासाठी हा प्रयत्न करण्यात आले आणि सर्वांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेतला असे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. काल केवळ मंत्री भेटले आणि आज अधिवेशनासाठी सर्व आमदार आल्याने त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही सगळ्यांनी आमची भूमिका त्यांना सांगितली मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असेही पटेल यावेळी म्हणाले.

आपण भाजपा सोबत जाणार नाही असे काल पवार म्हणाले होते मात्र आज अद्याप त्यांनी काहीही म्हटलेले नाही. देशातील विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवार आज बंगलोर इथे गेले नाहीत त्यामुळे या भेटीगाठी मागे नेमक्या काय हालचाली सुरू आहेत ते लवकरच स्पष्ट होईल.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *