संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी

 संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी

ठाणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी आनंद परांजपे बोलत होते. NCP demands immediate arrest of Sambhaji Bhide

साईबाबांना लाखो लोक दैवत मानतात पण साईबाबा हे देव नाहीत, त्यांना देव्हार्यात बसवू नका असे लोकांच्या भावनेचा अवमान करणारे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे तर राष्ट्रपिता महात्माा गांधी यांच्यामुळे भारताची जगात ओळख आहे. महात्मा फुले यांनी मुली-स्रियांना शिक्षण देण्याचे मोलाचे काम केले, राजाराम मोहन राॅय यांनी सती प्रथा बंद केली, अशा महनीय व्यक्तिंविरोधात अकोला, परभणी आदी ठिकाणी बोलताना बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे संभाजी भिडे यांनी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब अटकेचा आदेश द्यावा अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली.

संभाजी भिडे यांना अटक करा, संभाजी भिडे करतात काय, खाली डोके वरती पाय, संभाजी भिडे हाय हाय आदी घोषणा देऊन जिल्हाधिकारी परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता. या आंदोलनात स्वतः आनंद परांजपे यांच्यासह युवक अध्यक्ष विरु वाघमारे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितीन पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन मणियार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ML/KA/PGB
31 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *