राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हानिहाय बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हानिहाय बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २९
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महासंसदरत्न माननीय सुप्रिया ताई सुळे, तसेच प्रदेशाध्यक्ष आणि आमदार श्री. शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस आ. जितेंद्र आव्हाड साहेबांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सखोल चर्चा झाली.

मी या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सक्रिय सहभाग घेत, माझी भूमिका स्पष्टपणे मांडली की —
“महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण राज्यपातळीवर आणि देशपातळीवर मतचोरीविरोधात सुरू केलेली लढाई ही मर्यादित न राहता, ती मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत कायम राहिली पाहिजे.”
मुंबईत मराठी माणसाची सत्ता प्रस्थापित व्हावी, तसेच महाविकास आघाडीच्या एकत्र प्रयत्नांतून सकारात्मक बदल घडून यावा, असा माझा ठाम विश्वास मी मांडला.
तसेच, प्रभाग क्रमांक 124 मधील स्थानिक भूमिपुत्र म्हणून आम्ही करत असलेल्या कार्याची माहिती, आणि मुंबईतील युवकांमध्ये निर्माण झालेल्या नव्या सकारात्मक ट्रेंडची पार्श्वभूमी आदरणीय पवार साहेबांसमोर मांडली.
या सर्व चर्चेदरम्यान, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याचे म्हणणे संयमानं ऐकून घेतले, हीच आपल्या पक्षाची खरी ओळख आणि लोकशाहीची जपणूक करणारी परंपरा आहे.
माझ्यासाठी ही बैठक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान नव्हता, तर एक कार्यकर्ता म्हणून प्रेरणादायी अनुभव होता.
या बैठकीतून घेतलेली सकारात्मक ऊर्जा आणि मार्गदर्शन घेऊन आम्ही आगामी निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरू.
मुंबईतून परिवर्तनाची सुरुवात होईल —
मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल, आणि लोकशाहीचा विजय निश्चित आहे!KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *