राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

मुंबई, दि १५
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, प्रवक्त्या व माजी आमदार विद्याताई चव्हाण, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, मुंबई विभागीय अध्यक्षा राखीताई जाधव, माजी महापौर निर्मलाताई सामंत – प्रभावळकर, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र शिरोळे, प्रदेश उपाध्यक्ष तसबीर सिंग, सेवादल प्रदेशाध्यक्ष गिरीश सावंत, मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले, मुंबई विभागीय विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, अल्पसंख्यांक विभागाचे सुहेल सुभेदार, शीख समाज सेलचे राज्यप्रमुख सरदार जरनैलसिंघ गाडीवाले, LGBTQ+ सेलच्या राज्यप्रमुख प्रियाताई पाटील, प्रियाताई बांदिवडेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, देशाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास घडवलेला आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी राष्ट्रपुरुषांनी हुतात्मांनी पत्करल्यानंतर हा देश स्वतंत्र झाला जगाच्या इतिहासावर भारताच अधिराज्य आहे हे आपण वेळोवेळी पाहिलेल आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळावे याकरिता देशातील अनेक धर्माच्या जातीच्या लोकांनी या देशासाठी योगदान दिला आहे. आज परिस्थिती बदललेली आहे. सर्व देशाचा एकच संदेश या निमित्ताने आपण देत आहे. देशाचे सध्याचे अनेक राष्ट्रांसोबत असलेले संबंध हे आज विचार करण्यासारखे आहे. देशाच्या जनतेमध्ये एकतेची भावना आहे स्वतंत्र्याच्या दिवशी आज अनेक लोकांना आपण स्वातंत्र्य आहोत का असा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे. सत्ता येथे जाते ज्यांनी हुतात्मा पत्करलं त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक वेगळा विचार दिला तो आदर्श जगाने पाहिलेला आहे. तोच आदर्श या देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न माझ्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने आणि विचाराच्या असलेल्या सर्व जनतेने करण्याचा गरजेचं आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष कार्यनीत करत असताना माझ्यावर जबाबदारी पडलेली आहेत मी असेल सुप्रियाताई असेल आपण सर्व पदाधिकारी एका नवीन विचारातून लढा देण्यासाठी आपण उभे राहिलेलो आहे. आपली लढाई एवढीच आहे की लोकशाही जिवंत राहिली पाहिजेत, आज लोकशाहीवर आपल्याच देशात आघात होतो का त्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं का याचा विचार करण्याची गरज आज आहे.असे शशिकांत शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, आज देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याला 78 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही आपण स्वतंत्र आहोत कि नाही हा विचार देशबांधवांच्या मनात येत असेल तर ती कमतरता राज्यकर्त्यांनी दूर केली पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी देशात धर्मांचा वाद निर्माण करण्यात येत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी हुतात्मा पत्करलं ते अनेक धर्माचे जातीचे लोक होते पण आज आम्ही देशातच लढाई करतोय हे दुर्दैव आहे आपली लढाई एवढीच आहे की स्वातंत्र्यदिनी आम्ही साजरा करत आहेत या स्वातंत्र्याचा अधिकार कायम राहिला पाहिजे आज हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्येक कार्यकर्ता लढत राहो असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.
ह्याप्रसंगी बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, स्वातंत्र्य लढ्यात हौताम्य पत्करणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येकाला अभिवादन करत देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर म्हणजेच पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपेरेशन सिंदूर, संसदीय अधिवेशनातील विषय आणि मताधिकार आंदोलनावर भाष्य केलं आणि म्हणाल्या, “दिल्लीत निवडणूक आयोग मुख्यालयावर झालेल्या मताधिकार आंदोलनात आदरणीय पवार साहेब आवर्जून सहभागी झाले, कारण प्रश्न लोकशाहीचा होता. निवडणुका येतील आणि जातील, पण हा देश व इथली लोकशाही कायम टिकली पाहिजे. असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले
पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सैनिकांच्या हस्ते करण्यात यावे अशी मी मागणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे करते आज आपण देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत परंतु हा दिन आपण केवळ आर्मी, नेव्ही, एयरफोर्स यांच्यामुळे साजरा करू शकत आहे. त्यामुळे इथून पुढे 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावं सैनिकांचा मानसन्मान आपण केला पाहिजेत असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पक नागरिकांचा जीव गेला होता. पुण्यातील जगदाळे कुटुंब देखील या हल्ल्याचे बळी पडले आहे. या कुटुंबातील कर्ता पुरुष या हल्ल्यात शहीद झाला आहे. आजही त्या कुटुंबांना डोळे बंद केल्यानंतर सर्व प्रसंग डोळ्यासमोर दिसतो त्या कुटुंबांचे म्हणणे आहे की आमची काय चूक आहे. आम्ही सुट्टी साजरी करण्याकरिता जम्मू-काश्मीरमध्ये गेलो होतो. या हल्ल्यातील पीडित कुटुंब आजही विचारतात या हल्ल्यातील आतंकवाद्यांना कधी पकडणार आणि त्यांना कधी फाशीची शिक्षा होणार असे वारंवार मला विचारतात पण याचं खरंच उत्तर आपल्याकडे आहे का असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या आहेत.KK/ML/MS