NCERT विद्यार्थ्यांना देणार Operation Sindoor चे धडे

नवी दिल्ली, दि.२६ :सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना भारताच्या संरक्षण धोरण आणि राजनैतिक प्रतिसादाबद्दल जाणून घेण्यास मदत करण्यासाठी एनसीईआरटी ऑपरेशन सिंदूर वर एक विशेष वर्ग मॉड्यूल विकसित करत आहे.
या मॉड्यूलचे दोन भाग असतील – पहिला भाग इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा भाग इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या या विशेष मॉड्यूलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताच्या सामरिक लष्करी प्रतिसादावर लक्ष केंद्रित करणारे ८ ते १० पृष्ठे असतील असे एका सूत्राने सांगितले.