जहाल नक्षलवादी दलम सदस्य वर्गेशचे आत्मसमर्पण….
गोंदिया दि ११ : राज्य सरकारच्या नक्षल
आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी व दलम सदस्य वर्गेश उर्फ कोसा मंगलू उईका (वय २६, रा. बेदरे, पो.स्टे. जगरगुंडा) याने गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले. वर्गेशवर ३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते.
लहानपणापासूनच नक्षल चळवळीत सक्रिय राहिलेल्या वर्गेशने अखेर शासनाच्या पुनर्वसन धोरणावर विश्वास ठेवत शस्त्रसंघर्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस विभागाने समाधान व्यक्त केले आहे. माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचारास कंटाळून वर्गेशने सोमवारी जिल्हाधिकारी प्रजित नायर व पोलिस अधीक्षक गोरख भामरे, यांच्यासमोर आत्मसमर्पण करणाऱ्या वर्गेश उईकाचे पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी त्याचे स्वागत केले.ML/ML/MS