नवाब मलिकांना दणका!

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास पुन्हा नकार दिला आहे.
14 दिवसाची कोठडी
ईडीनं मलिकांच्या जामिनास विरोध केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची आणखी वाढ केली आहे. त्यामुळं आता नवाब मलिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यानंतर नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने ही मलिकांची कोठडी कायम ठेवली आहे.
काय व्यवहार आहे
मुंबईच्या कुर्ला भागातील दाऊदच्या हस्तकांकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीनं त्यांच्यावर ठेवला आहे. २० वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या हस्तक, त्याची बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मूळ मालकाला धमकावून त्या जमिनीचा व्यवहार केला होता, असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. नवाब मलिकांनी जमीन खरेदी करताना आधीच्या व्यवहारांची कोणतीही पडताळणी केलेली नव्हती, असाही आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळं आता न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मलिकांची किडनी निकामी ?
गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांची एक किडनी निकामी झालेली आहे. सध्या त्यांचं शरीर एकाच किडनीवर काम करत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ईडीकडून त्यांच्या डिस्चार्जसाठी घाई केली जात असल्याचा दावा मलिकांचे वकील अमित देसाई यांनी केला होता. नवाब मलिक हे सध्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार घेत असून त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहे.
SW/KA/SL
22 Feb. 2023