मुंबईतील दरड ग्रस्त भागांचे नव्याने सर्वेक्षण….

मुंबई दि ९ — मुंबईतील डोंगराळ भागातील दरडी कोसळणे प्रमाण लक्षात घेऊन याबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल आणि आय आय टी मुंबई ने यावर सुचवलेल्या उपाययोजनानुसार कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता, त्यावर राम कदम , अजय चौधरी, अशोक पाटील यांनी उपप्रश्न विचारले. २०१७ साली भारतीय भौगोलिक विभागाने केलेल्या सर्व्येक्षणानुसार मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ७४ दरड ग्रस्त ठिकाणे असून त्यातील ४६ ठिकाणं अतिधोकादायक आहेत. त्यापैकी ४० उपनगरात आहेत. आय आय टी मुंबई ने यावर काही उपाययोजना सुचविल्या आहेत, त्यानुसार ४७ कामांपैकी ४५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत, ती म्हाडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येतात असं मंत्री म्हणाले. ML/ML/MS