राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.Governor Koshyari given Guard of Honour by Navy; New Governor to take charge on Saturday
विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी राज्यपाल कोश्यारी रवाना झाले.
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.
ML/KA/PGB
17 Feb. 2023