पेहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कश्मिरी डोगरा समाजाच्या वतीने नवि मुंबई येथे आयोजित निषेध आंदोलन.

मुंबई ..3 मे
जम्मू आणि काश्मिर येथील पेहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कश्मिरी डोगरा समाजाच्या वतीने नवि मुंबई येथे आयोजित निषेध आंदोलनात माजी मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी सहभागी होऊन भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तान ला जशाच तसं उत्तर भारताने द्यावे अशी मागणी कश्मिरी डोगरा समाजाच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी काश्मीरी डोगरा समाजाचे अध्यक्ष कृष्णा पंडित, उपाध्यक्ष गगन महोत्रा, निधी शर्मा, जगदीश सिंह, यशपाल शर्मा, काश्मिरी पिडीत असोसिएशन चे अध्यक्ष अश्विन भट्ट, दिलीप भट्ट, शक्ती मुंशी ईतर पदाधिकारी कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.