गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ

 गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ

कोल्हापूर, दि. ३० :

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे पण अशी भूमिका घेतल्याने गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते. आज तो लिफाफा खोलण्यात आला आणि नविद मुश्रीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *