उद्यापासून धावणार नवी मुंबई मेट्रो

नवी मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्घाटनामुळे मागच्या दहा महिन्यांपासून रखडलेली नवी मुंबई मेट्रो अखेर उद्यापासून धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर विनाउद्घाटन मेट्रो सुरु होत आहे. उद्या बेलापूर ते पेंधर या मार्गावरुन मेट्रो धावेल.नवी मुंबई मेट्रोचा प्रोजेक्ट मागच्या तेरा वर्षांपासून रखडला होता. प्रोजेक्ट पूर्ण झाला परंतु उद्घाटनाअभावी दहा महिने प्रवाशी ताटकळले. पंतप्रधानांच्या तारखेचा हट्ट सरकारचा होता. मात्र आता तारीख निश्चित होत नसल्याने ही मेट्रो धावणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन व्हावं, अशी राज्य सरकारची इच्छा होती. मात्र मागच्या १० महिन्यांपासून पंतप्रधानांची तारीख निश्चित होत नव्हती. दुसरीकडे नवी मुंबईकर या मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. शेवटी उद्यापासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये असणार आहे.नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावेल. या मार्गांवर ११ स्टेशन्स असतील. शेवटी बेलापूरपर्यंत प्रवाशांना प्रवास करता येईल. बेलापूर लोकल स्टेनशवरुन पुढे प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मेट्रो सुरु होत आहे. SL/ KA/ SL16 Nov. 2023
Navi Mumbai Metro will run from tomorrow