नवी मुंबई पुन्हा ठरले स्वच्छ शहर

 नवी मुंबई पुन्हा ठरले स्वच्छ शहर

नवी मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पुन्हा एकदा मिळाला आहे. यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचाच क्रमांक आहे.

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. या सर्वेक्षणात नवी मुंबईचा महाराष्ट्र राज्यात नंबर वन कायम राहिला आहे.
कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार’ मानांकन मिळविणाऱ्या देशातील केवळ 2 शहरांमध्ये एक शहर तसेच हे मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे.

‘ओडीएफ कॅटेगरी’त सर्वोच्च ‘वाॅटरप्लस’ मानांकन नवी मुंबई चे कायम असून या बहुमानात लोकप्रतिनिधी, स्वच्छताप्रेमी नागरिक, स्वच्छताकर्मी, महापालिका अधिकारी-
कर्मचारी, प्रसारमाध्यमे यांच्या सक्रिय सहभागाचे मोठे योगदान आहे असे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी म्हटले आहे. Navi Mumbai has become a clean city again

ML/KA/PGB
11 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *