सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादन वाढले, पर्यावरणासाठी शुभसंकेत
travel nature
सावंतवाडी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण महाराष्ट्रात वन आच्छादनात मोठ्याप्रमाणात घट होत असतना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादनात २९.३७ चौ मीटर ने मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे.विशेष म्हणजे पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील वन आच्छादनात १ हजार, ८०५.७५ चौ. किमीने घट झाल्याचे केंद्रीय पर्यावरण विभागांच्या भारतीय वन सर्वे क्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे. हा अहवाल चार दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला असून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याची आकडेवारी यातून पुढे आली आहे.
ML/ML/PGB
1 Jan 2025