उद्यापासून रेशन दुकानदारांचा देशव्यापी संप
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेशनदुकान हे दशभरातील गोरगरिबांना किमान दोन वेळच्या अन्नधान्याची सोय करणारे शासनमान्य केंद्र. देशातील अन्नधान्यांच्या किमतीने उच्चांक गाठला असताना गरिबांना रास्त दरात धान्य देणाऱ्या रेशनदुकानांवर अवलंबुन रहावे लागते.मात्र या रेशनदुकानदारांनी उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून संप पुकारणार असल्याचे जाहीर आहे. राज्यभरात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रलंबित मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका देखील या पत्रकात करण्यात आली आहे.त्यामुळे सुखवस्तू लोक नववर्षाच्या स्वागताला सज्ज झालेले असताना गोरगरिब मात्र या संपामुळे चिंतेत पडले आहे.त्याच्यावर आता धान्यसाठी दुकान कधी उघणार याकडे लक्ष देण्याची वेळ येणार आहे. १ जानेवारी पासून रेशन दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच यात सर्व दुकानदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
रेशन दुकानदारांच्या संघटनेने याबाबात पत्रक काढले आहे. यात, ‘ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली, या देशपातळीवरील संघटनेने नव्या वर्षातील १ जानेवारी पासून देशव्यापी संप पुकारला आहे. या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सर्वांनी सहभागी घ्यावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच ‘आपली रेशन दुकाने बंद ठेवावीत. आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन बंद ठेवावीत. कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण देखील करू नयेत’, असे देखील काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन दुकानदाराकडून होणाऱ्या आंदोलनाची दाखल घेतली जात नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात फक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अश्वासन देण्यात आली. मात्र ठोस निर्णय घेतला जा नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनकडून हा संप पुकारण्यात आला आहे. यात राज्यातील रेशन दुकानदारांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाद्वारे प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार हे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. तसेच निदर्शने, धरणे, घंटा नाद, थाळी नाद करून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतील असेही या पत्रकात म्हटलं आहे.
ML/KA/SL
31 Dec. 2023