कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणी १७ ऑगस्टला आयएमएचा देशव्यापी संप
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचे देशभरात पडसाद उमटले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकही धास्तावले आहेत. तसेच या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळं देशातील सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्टला बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.